घरफोडीत अमेरिकन डॉलर लंपास

0
दागिण्यांसह 14 लाख 40 हजाराचा ऐवज चोरीस
पिंपरी-चिंचवड : चोरटयांनी घरफोडी करून घरातील सोने-चांदीचे दागिने, लॅपटॉप, किमती वस्तू आणि अमेरिकन डॉलर चोरून नेले. चोरटयांनी एकूण 14 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 7) दुपारी दोन ते सोमवारी (दि. 8) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास औंध कॅम्प परिसरातील रक्षक सोसायटी येथे घडली. ललीता दिपक बागवे (वय 62, रा. बांगला नंबर 22, रक्षक सोसायटी, औंध कॅम्प, पिंपळे निलख) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चार लाखाची रोकड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बागवे कुटुंबीय घरगुती कामानिमित्त रविवारी दुपारी दोन वाजता बाहेर गेले. रात्री अज्ञात चोरटयांनी त्यांच्या बंगल्याच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. घरात ठेवलेले सोने-चांदीचे दागिने, लॅपटॉप, घड्याळे, एटीएम कार्ड, अमेरिकन डॉलर आणि चार लाख रुपये रोख रक्कम असा एकूण 14 लाख 40 हजारांचा ऐवज चोरून नेला. बागवे सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरी आल्या. त्यावेळी हा याप्रकारे उघडकीस आला. त्यावरून सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस एस सूर्यवंशी तपास करीत आहेत.