भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाचा निकाल
भुसावळ – बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी केल्याप्रकरणी अटकेतील आरोपी बाबुलाल नागो राखुंडे (40, कवाडे नगर, भुसावळ) यास भुसावळ अतिरिक्त सत्र न्यायालयाने 11 महिन्यांची शिक्षा सुनावली. आरोपीने बाजारपेठ हद्दीत दोन लाख 30 हजार रुपये किंमतीचे 150 ग्रॅम सोन्याचे दागिने लांबवल्याप्रकरणी गु.र.नं. 110/16 प्रमाणे गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक रंगनाथ धारबडे, उपनिरीक्षक मनोज ठाकरे, शिवदास चौधरी यांनी तपास केला. सरकारी वकील नवाब अहमद शेख यांनी सरकारतर्फे बाजु मांडली. खटल्याकामी केसवॉच एएसआय दिलीप निकम, सुनील अहिरे, जितेंद्र साळुंके यांनी सहकार्य केले. खटल्याकामी केसवॉच एएसआय दिलीप निकम, सुनील अहिरे, जितेंद्र साळुंके यांनी सहकार्य केले.