जळगाव : जामनेर पोलिस ठाणे हद्दीत घरफोडी केल्यासह पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील बँक ऑफ महाराष्ट्र लुटीचा प्रयत्न करणार्या अट्टल घरफोड्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. जुबेर इकबाल तडवी (22, कासली, ता.जामनेर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला तपासकामी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.
सीसीटीव्हीद्वारे गवसला संशयीत
वरखेडी येथील बँक ऑफ महाराष्ट्र लुटीचा प्रयत्न केल्याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.नं. 148/2022 भा.द.वि. 457, 380, 511 नुसार गुन्हा दाखल होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या गुन्ह्यातील संशयीत हा जामनेर तालुक्यातील कासली येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले होते. संशयीत जुबेर ईकबाल तडवी हा पहुर येथील आठवडे बाजारात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीला जामनेर पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या भांदवि 457, 380, 511 या गुन्ह्याची देखील त्याने कबुली दिली.
यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल देवढे, लक्ष्मण अरुण पाटील, किशोर ममराज राठोड, रणजीत अशोक जाधव, विनोद सुभाष पाटील आदींनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.