पापड बनविणार्या महिलेच्या आले लक्षात; एमआयडीसी पोलीसांची धाव
रामानंद पोलिसात गुन्हा दाखल; 13 हजारांचा मुद्देमाल जप्त
जळगाव । रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नुतन वर्षा कॉलनीत घरफोडी करतांना चोरट्याला नागरिकाच्या समय सुचकतेच्या मदतीने एमआयडीसी पोलिसांनी पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास रंगेहाथ पकडले. दरम्यान घटनास्थळ रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत असल्याने एमआयडीसी पोलिसांनी चोरट्याला ताब्यातील मुद्देमालासह ताब्यातील चारचाकी वाहन रामानंद नगर पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेबाबत रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरफोडीच्या घटनेप्रकरणी रामानंद नगर पोलिसात घरमालक संतोष शंकर रहाणे यांचे भाऊ ईश्वर रहाणे यांच्या फिर्यादीवरून 13 हजार 200 रुपयांचा ऐवज लांबवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास स.फौ. गोपाल चौधरी, पो.कॉ. प्रदिप चौधरी करीत आहे.
मोहाडी रोडवरील पुजा अपार्टमेंट समोर संतोष शंकर रहाणे यांचे घर आहे. रहाणे कुटुंबीय गेल्या अनेक दिवसांपासून पुणे येथे राहत असल्याने त्याचे घर बंदावस्थेत होते. घरातील घर बंद असल्याचा फायदा घेत दोन भुरट्या चोरट्यांनी टाटा सुमो (एमएच 19 क्यू 6724) गाडीने येवून घराच्या कपाऊंडवॉलवर उड्या घेवून बंद घराचे दरवाजाला लावलेले कुलूप तोडून दोन्ही भुरट्या चोरट्यांनी आत प्रवेश करत चोरी करून घरातील किरकोळ सामान घरातून बाहेर काढून बाहेरील कंम्पाऊंडवरल सामान ठेवत चार चाकी गाडीमध्ये सामान ठेवत होते.
समोरील इमारतीत महिलेची सुचकता
रहाणे यांच्या घरासमोर असलेल्या अपाटमेंटमधील एक महिला पापड बनविण्यासाठी पहाटे 3 वाजता उठली असल्याने तिला समोरील घरात चोरी होतांना दिसली. तिली तिघेजण संशयास्पद हालचाली होत असल्याचे दिसून आल्याबाबती माहिती तिने तिच्या कुटुंबियांना सांगितले. दरम्यान या महिलेच्या सदस्यांनी याप्रकाराबाबत एमआयडीसी पोलिसांना फोन करून घटेनची माहिती दिली. पोलिस कर्मचारी स.फौ. निंबाळकर, नितीन पाटील, गुन्हे शोध पथकातील कर्मचारी अशरफ शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने एका चोरट्याला रंगेहाथ चोरी करतांना ताब्यात घेतले. तर दुसरा चोरटा पळून जाण्यास यशस्वी झाला. एमआयडीसी पोलिसांनी घरात जावून पाहिले असता, मुख्य दरवाज्याचा कडी कोयंडा तुटलेला दिसून आला होता.
चोरट्याची गाडी जप्त
घटनास्थळ रामानंद नगर पोलिसांच्या हद्दीत असल्याने एमआयडीसी पोलिसांच्या अधिकारी व कर्मचार्यांना घटनेची माहिती दिली. रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या कर्मचार्यांनी अनिल कुकरेजा रा. दौलत नगर या चोरट्याला ताब्यात घेतले. अनिल कुकरेजा व त्याच्या सोबत आणखी एक चोरटा (एमएच 19 क्यू 6274) क्रमांकाच्या कारने आले होते. घटनास्थळावरून चोरट्याची कार देखील जप्त करण्यात आली आहे. दरम्यान पोलीस कार कोणाच्या मालकीची आहे. याबाबत पोलिस तपास करीत आहे. तसेच चोरटा अनिल याच्यासोबत असलेल्या दुसर्या चोरट्याचा पोलिस शोध घेत आहे.
असा होता मुद्देमाल
चोरट्यांनी घरातील समानासह 10 हजार रूपयांची चिल्लर (5/10 रूपयांची नाणी), 2 हजार रूपये किंमतीचे चांदीचे जोडवे व शिक्के, एक हजार रूपयांचे गॅस सिलेंडर, 182 रूपयांचे किरकोळ चिल्लर असे एकुण 13 हजार 182 रूपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आला.