अमळनेर (प्रतिनिधी)- बाबा बोहरी खून प्रकरणातील मुख्य आरोपी कैलास नवघरे याने केलेल्या घरफोड्यांमध्ये सहभाग असल्याच्या संशयातून अमळनेरच्या नगरसेवक पुत्रालाही अटक करण्यात आल्याने राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे. कैलास नवघरे याने शहरात विविध ठिकाणी घरफोडयांची कबुली दिली असून त्याच्या सोबत गुन्ह्यात कोण कोण सहभागी होते ? याची चौकशी करताना पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांना अनेक धागेदोरे हाती लागले आहेत. नगरसेवक सलीम शेख यांचा पुत्र अशपाक उर्फ पक्या सलीम शेख (24, रा दर्गाअली मोहल्ला, गांधलीपुरा) याला पोलिसांनी 2017 मधील प्रताप मिल कंपाऊंड मधील गोदामज्ञतील तंबाखू पुड्या व माचीस बॉक्स प्रकरणातील घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.