जळगाव। रायसोनीनगरातील विश्वप्रभा अपार्टमेंट जवळ 31 जानेवारी रोजी चोरी झाली होती. या गुन्ह्यात रामानंदनगर पोलिसांनी एका संशयीताला अटक केली आहे. रायसोनी नगरातील शिवनेरी चौकात नरेश बनवारीलाल प्रजापत याचे दुकान आणि घर आहे. 30 जानेवारी रोजी ते गावाला गेले होते.
31 जानेवारी रोजी घराचे कुलूप तोडलेले होते. त्यात चोरट्यांनी 90 हजार रुपयांचे दागिने आणि 10 हजार रुपये रोख असा एकूण 1 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी सुनील उर्फ सल्ल्या लक्ष्मण पाटील याला शनिवारी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे.