घरफोड्यातील मालाची विल्हेवाट लावणारा दीपक पाटील जाळ्यात

0

खून प्रकरणातील आरोपीच्या मुसक्या आवळल्यानंतर उलगडा

अमळनेर– बाबा बोहरी खून प्रकरणातील मुख्य आरोपी कैलास नवघरे यास अटक केल्यानंतर 8 ते 10 घरफोड्या उघडकीस आल्या असून या मालाची विल्हेवाट लावणार्‍या दीपक पाटील यास पोलिसांनी अटक केली. कैलास नवघरे ने शहरात अनेक घरफोड्या केल्याची कबुली पोलिसांना दिली असून तो चोरलेला माल व सोने शहरातील बोरसे गल्लीतील पवन चौकातील दीपक रावा पाटील यांच्यामार्फत विल्हेवाट लावत होता. ताडेपुरा भागातील रोख रक्कम व दागिन्यांची विल्हेवाट दीपक ने लावल्याने त्याला भा.द.वि कलम 454,457, 380 प्रमाणे दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर करीत आहेत. पोलिसांना काही घरफोड्यांमधील सोने व इतर वस्तू हस्तगत करण्यात यश आल्याचे सूत्रांनी सांगितले.