जळगाव। रामानंदनगर पोलिसांनी अट्टल घरफोड्या सोपराजा याला 29 एप्रिल रोजी अटक केली होती. त्यावेळी त्याचा साथीदार अजय हिरालाल पाटील हा पोलिसांच्या हातून निसटला होता. सोपराजाने अजय पाटील आणि आणखी एका साथीदारांच्या सहायाने शहरात पाच घरफोड्या आणि 6 दुचाकी चोरल्याची कबुली दिली होती.
अजय याला रामानंदनगर पोलिसांच्या पथकाने 22 मे रोजी अटक केली होती. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत गुरूवारी संपली. त्याला न्यायाधीश कस्तुरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.