घरफोड्यास 12 पर्यंत सुनावली पोलिस कोठडी

0

जळगाव। जीवननगरात घरफोडी करणार्‍या दोन्ही चोरट्यांना रामानंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्या तिसर्‍या साथीदारालाही मंगळवारी जेरबंद केले. त्याला बुधवारी न्यायाललयात हजर केले असता त्यास 12 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

जीवननगरातील रहिवासी भूषण शांताराम गुरव यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी कपाटातील 29 हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने आणि 10 हजार रुपये रोख असा एकूण 39 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी पोलिसांनी राजेंद्र ऊर्फ सोपराजा दत्तात्रय गुरव व दुसरा संशयित राहुल संदीप सोनवणेयांना अटक केली होती. दोघे पोलिस कोठडीत असून मंगळवारी त्यांचा तिसरा साथीदार भूषण ऊर्फ जिगर रमेश बोंडारे याला अटक करण्यात आली. त्याला आज बुधवारी न्या. व्ही.एच. खेडकर यांच्या न्यायालयात हजर केले असता 12 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.