चाळीसगाव-आई चँरीटेबल ट्रष्ट संचलित आई फाऊंडेशन चाळीसगाव तर्फे तालुक्यातील माताभगिनींसाठी “श्यामची आई संस्कार स्पर्धा “घेण्यात आली.त्या स्पर्धेचा बक्षिस वितरणसमारंभ चाळीसगाव येथील न्यायाधीश श्रीमती अनिता गिरडकर यांचे हस्ते संपन्न झाला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा.तानसेन जगताप होते.व्यासपिठावर आई फाऊंडेशन चे श्री मुरलीधर कोतकर व सौ.कमल कोतकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते .
अलिकडे कौटुंबिक पतीपत्नीतील वादापासून तर मालकी हिस्स्याच्या वादापर्यंतच्या खूप दावे न्यायालयात वाढले आहेत. दुर्दैवाने रक्ताच्या नात्याने जवळ असणाऱ्या पण मनाने दूर गेलेल्या सुशिक्षित कुटुंबात हे वादाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे.म्हणून तळपायाला घाण लागू नये यापेक्षा मनाला घाण लागू नये हे सांगणारी श्यामची आई प्रत्येक कुटूंबात असणे काळाची गरज असल्याचे सांगत आई फाऊंडेशन ने आयोजित केलेल्या या स्पर्धेचे भरभरून कौतुक केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.तानसेन जगताप यांनी महिलांनी दूरदर्शनवरील मालिका पाहण्यापेक्षा श्यामची आई सारखे अनेक बोध देणारे व कुटूंब संस्कार घडविणारे पुस्तके मुलामुलींसोबत वाचली पाहीजेत असे सांगितले .कारण आपण जे करतो त्याचेच अनुकरण आपली मुले करतात.म्हणून श्याम घडविणेअगोदर श्यामची आई घडविणे महत्त्वाचे आहे असेही ते म्हणाले.
डॉ.चेतना कोतकर यांनी आई फाऊंडेशतर्फे आयोजीत विविध उपक्रमांची माहिती दिली. स्पर्धेत सहभागी प्रत्येक मातेला संस्कार सन्मानपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
प्रथम क्र.ज्योती नवनाथ पाटील, द्वितीय क्र.सुलभा आमृतकार, संजीवनी पाटील, तृतीय क्र.अनिता विष्णू राठोड या चारही विजेत्यांना पैठणी देवून न्या.गिरडकर यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत सहभागी सर्व महिलांचे व उपस्थित सर्व मान्यवरांचे आई फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ विनोद कोतकर यांनी आभार मानले व “खरा तो एकचि धर्म ” या साने गुरुजी लिखीत प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.