घराचे छत कोसळले

0

शिरूर । संभाजीनगरमधील हुडको वसाहतील एका घराचे छत कोसळून एकजण जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. महेश चौधरी असे जखमीचे नाव आहे. चरण चौधरी यांचे घर आहे. त्यांचा मुलगा महेश आजारी असल्याने झोपला होता. त्यावेळी अचानक घराचे छत त्याच्या अंगावर कोसळले.

त्यामुळे महेशच्या चेहर्‍याला आणि छातीला मुका मार लागला आहे. नगरसेवक संदीप गायकवाड, मंगेश खांडरे बांधकाम विभागाचे अभियंता संजय कुंभार, शहर अभियंता शंकर कांबळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. महेश यांच्याशी चर्चा करून आवश्यक उपाययोजनाविषयी सूचना दिल्या.