Action taken against illegal village liquor seller in Yaval यावल : शहरातील शिवाजीनगर भागात घराच्या आडोशाला अवैधरीत्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करताना संशयीत सुभाष शामराव वडर – शिंदे याला अटक करण्यात आली. संशयीताकडून एक हजार 900 रुपये किंमतीची 35 लिटर गावठी दारू जप्त करून जागेवर नष्ट करण्यात आली.
गोपनीय माहितीरून कारवाई
यावल पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुदाम काकडे, सहाय्यक फौजदार असलम खान दिलावर खान, सहायक फौजदार विजय पाचपोळ, पोलिस नाईक किशोर परदेशी यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास सहा.फौजदार विजय पासपोळ करीत आहे.