लोहारा। पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील जुना प्लॉट परिसरातील काही घराच्या गच्चीवरुन विजपुरवठा करणार्या विद्युततारा नेण्यात आले आहे. त्यामुळे वास्तव्यास असलेल्यांचा जीवीतास विद्युततारांमुळे धोका निर्माण झाला आहे. महावितरण कंपनीने याकडे दुर्लक्ष केले आहे. महावितरणचे कर्मचारी याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने येथे राहणार्या कुटुंबीय हतबल झाले आहे. वीजविरतण कर्मचारी नित्य गावाला भेट देतात, मात्र याकडे दुर्लक्ष करतात.
वेळोवेळी मागणी
जुना प्लॉट भागातील राजेंद्र दौलत चौधरी व एकनाथ तुकाराम चौधरी यांच्या घराच्या गच्चीवर काही फुट अंतरावरुन विद्युत वाहिनी तारा गेल्या आहेत. या तारा हटविण्याची त्यांनी वेळोवेळी मागणी केली आहे.
गच्ची पासून तीन फुटांच्या अंतरावर तारा
परंतु महावितरण याकडे लक्ष देत नसल्याचे दिसून येते. या विद्युततारांना हटविण्यासाठी लागणारा खर्च देण्यास तयार असतांनाही महावितरण कर्मचारी पुढाकार घेत नाही. काही दिवसानंतर पावसाळा सुरु होणार असून पावसाळ्यात तारांवरुन थेट गच्चीवर पाणी पडू शकते किंवा वार्यामुळे तारा तुटु शकतात यातुन दुर्घना संभवण्याचा दाट धोका आहे. विद्युततारा अगदी दोन ते तीन फुटाच्या अंतावरच असल्यासने स्पर्श होण्याची शक्यता नाकारता येत नसून यातुन जीवत हानी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. महावितरणच्या कर्मचार्यांनी याकडे लक्ष पुरविण्याची गरज असल्याची मागणी कुटुंबीय करीत आहे.