बोदवड- तालुक्यातील हरणखेड येथील वृद्धा घराच्या पायर्यांवरून पडल्याने त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना 8 मे रोजी त्यांचा मृत्यू झाला मात्र कागदपत्रे गुरुवारी बोदवड पोलिसांना प्राप्त झाल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शांताबाई दामू तायडे (70, हरणखेड, ता.बोदवड) असे मृत वृद्धेचे नाव आहे. याबाबत जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉ.अजय सोनवणे यांनी खबर दिल्यावरून नोंद करण्यात आली. तपास हवालदार संजय भोसले करीत आहेत.