खडकी : ज्याप्रमाणे घरातील स्वच्छते संबधीची काळजी घेतो, त्याचप्रमाणे परिसर स्वच्छ ठेवण्यासंबधी ही काळजी घेतली तर रोगराई आजार नष्ट होवून उत्तम आरोग्य प्राप्त होईल. असे प्रतिपादन संदेश विघ्नहर्ता न्यास पुणे पोलिसचे विश्वस्त डॉ. मिलिंद भोई यांनी केले. खडकी कँन्टोन्मेंट बोर्ड व ज्ञानसागर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान मोहिम अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष कमलेश चासकर, सदस्य सुरेश, कांबळे, आरोग्य अधिक्षक बी.एस.नाईक फाऊंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब आहेर, तुळशीदास आहेर, अनिल दवंडे, प्रेमकुमार जावळे आदी मान्यवर उपस्थित होते.
महादेववाडी परिसरात स्वच्छता मोहिम
हे देखील वाचा
वॉर्ड क्रमांक 1 येथिल महादेव वाडी परिसरात उपस्थित मान्यवरांनी सफाई करीत स्वच्छता मोहिम राबवली. यावेळी महादेव वाडी शेजारील परिसरात उपाध्यक्ष चासकर, डॉ. भोई, सदस्य कांबळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रसंगी, दहावीच्या परिक्षेत राज्यात दुसरा क्रमांक पटकविणारी विद्यार्थींनी श्वेता बाराथे हिचा देखील सन्मान यावेळी झाला.
नागरिकांनीही उपक्रमात पुढाकार घ्यावा…
परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही केवळ कँन्टोन्मेंट प्रशासनाची नसून सर्वसामान्य नागरीकांनीही या कामी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे वक्तव्य फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेर यांनी यावेळी केले. तसेच, कँटोन्मेंट बोर्डाच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम आगामी काळात राबवून खडकी परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संकल्प यावेळी आहेर यांनी केला. प्रास्ताविक आहेर यांनी केले. तर सुत्रसंचालन व आभार जावळे यांनी मानले.