जळगाव – बंद घरातून अज्ञात चोरट्याने 10 हजार रूपये किंमतीचा मोबाईल लंपास केल्याची घटना 18 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून याबाबत तालुका पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रशांत प्रभाकर इंगळे (वय-39) रा. रजनी पिठाची गिरणी, दादावाडी यांच्या घरातून गुरूवारी 18 रात्री 11 ते 11.30 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरून नेला. याबाबत प्रशांत इंगळे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.