मुंबई: रातोरात कोणालाही काही अपेक्षित नसताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांचे एक गट फोडून भाजपला पाठींबा दिला. त्यामुळे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले आहे. अजित पवारांच्या या निर्णयाला खुद्द शरद पवार यांचा देखील पाठींबा नाही. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे या देखील अजित पवारांच्या या निर्णयाने भावूक झाल्या आहेत. त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसून आले आहे. अजित पवारांच्या निर्णयामुळे आमच्या पक्षात आणि कुटुंबात फुट पडली आहे असे status सुप्रिया सुळे यांनी ठेवले होते.
आज शनिवारी सकाळी ८ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या पाठींब्यावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ही घटना संपूर्ण देशात खळबळ माजवणारी होती.