जळगाव : पाळीव कुत्रा घरात घुसल्याचा जाब विचारल्याने महिलेला बेदम मारहाण करीत शिवीगाळ करण्यात आली. जळगावातील रामेश्वर कॉलनीत ही घटना घडली. एमआयडीसी पोलिसात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
एकाविरोधात गुन्हा दाखल
शहरातील रामेश्वर कॉलनी परीसरातील शांती नगरात सुलोचना जगदीश चव्हाण (29) या वास्तव्यास असून याच परीसरातील हिंमत पवार (पूर्ण नाव माहित नाही) यांनी पाळलेला कुत्रा शनिवार, 9 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता सुलोचना यांच्या घरात घुसला. त्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने हिंमत पवार याने महिलेला शिविगाळ करीत त्यांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण करीत असतांना त्यांनी महिलेला रस्त्यावर ढकलून दिल्याने त्यांच्या हाताला दुखापत झाली असून त्या जखमी झाल्या. त्यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्याने हिंमत पवार विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री आठ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास महेंद्र पाटील करीत आहे.