पाटणा – घरात घुसून एका माजी आयुक्त आणि त्यांच्या पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेवरुन परत एकदा बिहारमधील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होत नसल्याचे दिसून येत आहे.
निवृत्त अधिकारी हरेंद्र प्रताप व त्यांची पत्नी सपना दास गुप्ता हे बुद्धनगर परिसरात वास्तव्यास होते. या दोघांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरी संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने पूर्ण परिसरात दहशत पसरली आहे. ही घटना राजधानी पाटणाच्याजवळ बुद्धानगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली. पोलीस अधीक्षक मनु महाराज यांनी घटनेची पाहणी करुन अपराध्यांना त्वरीत पकडण्यात येईल, असे कटुंबियांना सांगितले.