घरात घुसून लूट करीत मारहाण ; पाच जणाविंरूध्द गुन्हा

0
भुसावळ:- शहरातील जळगाव रोडवरील मथुरा अपार्टमेंटमधील रहिवासी गणेश बोरे यांना अपार्टमेंटसह अन्य ठिकाणच्या पाच जणांनी मारहाण करून त्यांच्याजवळील रोख रक्कम व सोन्याची अंगठी हिसकावून घेतल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पाच जणाविंरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
गणेश बोरे यांना 27 मे 2017 रोजी रात्री 9.15 वाजता स्वप्नील पाटील, गोकूळ पाटील, विशाल नारखेडे (रा. मथुरा अपार्टमेंट, भुसावळ), रविंद्र पाटील (रा. गोंडगाव) व अमित पाटील (रा. वृध्दावन कॉलनी, भुसावळ ) यांनी मारहाण केली होती. यावेळी बोरे यांच्या बोटातील पावणे सात ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी 19 हजार 600 रूपयांची तसेच खिश्यातील 13 हजार 500 रूपये रोख असा माल काढून घेण्यात आला होता. बोरे यांना मारहाण झाल्याने ते जखमी झाले होते. अपार्टमेंटमध्ये कोणते गैरकृत्य चालतात, तुला जास्त चिंता पडली आहे का, असे म्हणत संशयीतांनी मारहाण केली होती. बोरे यांनी  या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्या अर्जाच्या चौकशीवरून चाचही जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक के.टी.सुरळकर हे तपास करीत आहे.