घरात दडवले अवैध दिड लाखांचे सागवान लाकूड : वनविभागाच्या छाप्याने उडाली खळबळ

Illegally Stored Teak Worth Half A Lakh Seized In Sawada रावेर : वनविभागाच्या वनथकाने अवैधरीत्या सागवान लाकडाची साठवणूक केल्याप्रकरणी सावदा शहरातील एका घरात छापेमारी करीत एक लाख 56 हजारांचे लाकूड जप्त केल्याने शहरात खळबळ उडाली. या प्रकरणी रावेर वनपाल यांनी भारतीय वन अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
यावल उपवनसंरक्षक एच.एस. पद्मनाभ तसेच यावल सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीरक्षेत्र अधिकारी यावल व रावेर यांनी संयुक्तरीत्या मौजे सावदा नगरपालिका हद्दीतील सुगंगा नगरातील गणेश कोळी यांच्या बांधकाम सुरू असलेल्या घराची झडती घेतली असता त्यात अवैधरीत्या सागाचे एक लाख 56 हजार रुपये किंमतीचे लाकूड आढळून आले. दरम्यान, नंदकिशोर अरुण चोपडे (रा.निंभोरा स्टेशन, रावेर) यांनी नवीन घरबांधणी व फर्निचर कामासाठी अवैधरीत्या सागाच्या लाकडांची वाहतूक करून त्याचा साठा घरात केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
वनक्षेत्रपाल विक्रम पद्मोर, वनक्षेत्रपाल अजय बावणे, वनपाल रवींद्र सोनवणे, वनरक्षक गोवर्धन डोंगरे, कृष्णा शेळके, भैय्यासाहेब गायकवाड, संभाजी सूर्यवंशी, राजू बोंडल, युवराज मराठे, आयशा पिंजारी, कल्पना पाटील, सविता वाघ, अरुणा ढेपले, वाहन चालक सचिन पाटील, विनोद पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.