जळगाव : घराच्या वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या तळमजल्याच्या घराचा कडी कोयडा तोडून घरात चोरट्यानी गॅस सिलेंडर व कम्पाउंडमध्ये लावलेली दुचाकी लांबविल्याची घटना रविवारी सकाळी शहरातील प्रेमनगर परिसरातील लक्ष्मन नगरात उघडकीस आली आहे
लक्ष्मण नगरात प्लॉट क्रमांक 08/ 1 येथे योगेश वामन वाणी ( कामळस्कर ) (वय 48) हे पत्नी कांचन, मुलगा आदित्य, मुलगी समीक्षा या कुटुंबियांसोबत वास्तव्यास आहे .ते प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात.
वरच्या मजल्यावर झोपले अन् तळमजल्यावर चोरी
शनिवारी तळ मजल्यावरील घराची आतून कडी बंद करून कुटूंबातील सदस्य वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले. रात्री चोरट्यांनी घराला लक्ष्य करत मागच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घराच्या कपाटातील सामान अस्ताव्यस्त करत मुद्देमालाचा शोध घेतला. परंतू चोरट्याच्या हाती काहीच लागले नाही. त्यानंतर चोरट्यांनी घरातील गॅस सिलेंडर व कम्पाउंडमध्ये लावलेली दुचाकी ( क्रमांक एम एच 19 ए. के. 6333) हिचे लॉक तोडले. यानंतर दुचाकी व सिलेंडर घेऊन चोरट्यांनी पोबारा केला .
लॉक न तुटल्याने एक दुचाकी वाचली
यादरम्यान चोरट्यांनी योगेश वाणी यांचा मुलगा आदित्य याची मोपेड दुचाकी (क्रमांक एम एच 19 ए. के. 6333) हिचे लॉक तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात ते अपयशी ठरले. म्हणुन दुचाकी वाचली. याप्रकरणी योगेश वाणी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.