Tractor batteries extended from Muktainagar मुक्ताईनगर : घराबाहेर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या सात हजार रुपये किंमतीच्या दोन बॅटर्या चोरट्यांनी लांबवल्या. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सात हजारांच्या बॅटरी लंपास
गणेश रामदास भोई (29, श्रीराम नगर, मुक्ताईनगर) यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी घराबाहेर ट्रॅक्टर लावल्यानंतर 14 ते 15 नोव्हेंबरदरम्यान चोरट्यांनी सात हजार रुपये किंमतीच्या दोन बॅटर्या लांबवल्या. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास नाईक महंमद तडवी करीत आहेत