जळगाव । माझ्या घरासमोरुन का गेला यांचा राग आल्याने शहरातील नागसेन नगर परिसरातील एकास मारहाण करण्यात आली. रामेश्वर कॉलनी येथे वास्तव्यास असलेल्या रोहिदास हरीश्चंद्र झाल्टे यास अशोक तुकाराम कोळी याने मारहाण केल्याची घटना शनिवारी 27 रोजी रात्रीच्या सुमारास घडली. रोहिदास यास दमदाटी करुन कपडे धुण्याच्या लाकडी बॅटने मारहाण केल्याने झाल्टे यांनी कोळी यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री 11 वाजेच्या सुमारास तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मात्र आरोपीस अटक करण्यात आलेले नव्हते. फिर्यादीचे मारहाणीत 8 हजार रुपये किंमतीच्या मोबाईलचे नुकसान झाले आहे. घटनेची तपास सहाय्यक फौजदार राजाराम पाटील करीत आहे.