घरासह परिसर स्वच्छतेची युवकांनी घेतली शपथ

0

जळगाव। भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयाचा व नेहरु युवा केंद्र जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ते 15 ऑगस्त दरम्यान संपूर्ण जिल्हाभरात स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मेजर दिलवरसिंग, नेहरु युवा केंद्र संघठन नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार सर्व जिल्हाभर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षारोपन
गुरुवारी 3 रोजी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचा शुभारंभ युवक व युवतीना शपथ देऊन करण्यात आली. वर्षातून 100 दिवस दिवसातुन 2 तास गांव, शहर, गल्ली, परिसरातील स्वच्छता मोहीम राबवून व इतरांना सामावून घेण्याची शपथ सर्व स्वयंसेवक यांना जिल्हा युवा समन्वयक अतुल निकम यांनी दिली. तसेच बस स्टँण्ड, रेल्वे स्टेशन, चौक, परिसर, इत्यादी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. कार्यक्रमात दिशा बहुद्देशीय संस्थेचे विनोद ढगे, लेखपाल सुनील पंजे, स्वयंसेवक राकेश वाणी, अमोल भालेराव, सत्येन्द्रराज बिर्‍हाडे, गणेश सोनवणे, धनश्री मिस्त्री, कविता सुरवाडे, राजरत्न हिरवाले आदी उपस्थित होते.