नवी दिल्ली । देशाचे पंतप्रधान देशातील गरिब जनतेला घरे देण्यासाठी देशभरातून अर्ज भरून घेत आहे.त्याच्यासाठी घर देण्यासाठी सर्वपतोरी प्रयत्न सुरू आहे. असे असतांना क्रिकेट जगातील खेडाळू सोडल्यास आपल्या देशात इतर खेळातील खेळाडूंना दुय्यम स्थान मिळतो ही काही नविन गोष्ट नाही,प्रशासन आणि सरकारच्या अनास्थेचा सामना करावा लागला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईचा हॉकीपटू युवराज वाल्मिकीनेही ट्विट करुन सरकारी अनास्थेची काहाणी सांगुन टाकली.युवराज आणि देवेंद्र वाल्मिकी हे भारतीय हॉकी संघातले दोन महत्वाचे खेळाडू असून ते सख्खे भाऊपण आहे.त्यांनी अनेक महत्वाच्या स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. 2014 साली भारताच्या विश्वचषक संघात युवराज वाल्मिकी भारतासाठी खेळला होता. यानंतर दिल्ली वेवरायडर्स या संघाकडून खेळताना युवराजने आपल्या संघाला हॉक़ीलिग स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले होते. युवराजचा भाऊ देवेंद्र वाल्मिकी मागच्या वर्षी रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाकडून हॉकी खेळला होता. मात्र या दोन्ही बंधूंचे मुंबईतले सुरुवातीचे दिवस काही चांगले नव्हते. मुंबईतल्या एका गॅरेजमध्ये वाल्मिकी कुटुंब रहायचे. सुरुवातीच्या दिवसांत युवराज राहत असलेल्या मुंबईच्या घरात वीजही नव्हती. मात्र यानंतर माजी खेळाडू धनराज पिल्ले आणि अन्य खेळाडूंनी मदत केल्यानंतर युवराजला मुंबईत तात्पुरत घर मिळाले.
आतापर्यंत 60 हून अधिक सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केलेल्या युवराजने आपल्याला देण्यात आलेले आश्वासन पूर्ण झाले नसल्याची खंत बोलून दाखवली. यावेळी युवराजने लोकांनीही या प्रकरणात आपली मदत करावी असे आवाहन केले आहे. ज्यावेळी प्रशासनाने मला घर देण्याचे आश्वासन दिले. त्यावेळी माझ्यासाठी तो एक आशेचा किरण होता. मात्र आता सहा वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतर अजुनही मला घर मिळालेले नाहीये. सध्या युवराज भारतीय संघाच्या बाहेर आहे. मात्र राष्ट्रीय स्पर्धा आणि जर्मन लीग स्पर्धेत युवराज हॉकी खेळतोय. त्यामुळे युवराजची घरासाठी सुरु असलेली वणवण संपते का, हे पाहावे लागणार आहे.