Pachora Taluka Shaken : 21-year-old woman raped after threatening to kill child पाचोरा : तालुक्यातील एका गावातील 21 वर्षीय विवाहिता घरी एकटी असल्याची पाहून नराधमाने अत्याचार केला तसेच आक्षेपार्ह फोटो काढून हे फोटो पतीसह सासरच्यांना दाखवेल, मुलाला मारून टाकेल, अशी धमकी देत वारंवार अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पीडीतेच्या तक्रारीवरून दोघांविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
घरी कुणी नसताना अत्याचार
21 वर्षीय पीडितेच्या तक्रारीनुसार, सुमारे दिड महिन्यापूर्वी पती, सासू-सासरे व दिर शेतात गेल्यानंतर दुपारी 12 वाजेच्या सुमारास विवाहिता घरी एकटी असताना संशयीत आरोपी वैभव चौधरी याने अनधिकृतपणे प्रवेश करीत विवाहितेचे तोंड दाबून तू ओरडली तर विचार कर, अशी धमकी देत अत्याचार केला तसेच वैभवने त्याच्या मोबाईलमध्ये दोघांचे फोटोदेखील काढले. यानंतर वैभव चौधरी याने पीडितेच्या व्हॉट्सअॅपवर मॅसेज करीत काढलेले फोटो पाठवले. हे फोटो तुझ्या नवर्याला व सासू, सासर्यांना दाखवेल तसेच तुझ्या मुलाला मारुन टाकेल, अशी धमकी देत पीडितेवर 1 ऑगस्ट ते 7 ऑक्टोंबरदरम्यान वेळोवेळी अत्याचार केला.
कुटुंबियांना केली मारहाण
पीडितेच्या तक्रारीनुसार, शुक्रवार, 7 ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास पीडिता घरी एकटी असताना आरोपी वैभव हा पुन्हा एकदा पीीतेच्या घरात शिरला मात्र पीडितेचे सासू-सासरे व पती शेतातून घरी परतले. पीडितेचा पती व सासरे यांनी वैभवला तू आमच्या घरात का आला? असे विचारले असता त्याने पीीतेच्या पती व सासर्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. आरडाओरड एकून वैभवचा चुलत भाऊ ऋषी चौधरी हा हातात लाकडी काठी घेऊन आला. त्यानेही पीडितेच्या पतीच्या डोक्यात काठी मारली तसेच सासू सासर्यांनादेखील चापटा-बुक्कयांनी मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार करीत आहेत.