घरे नियमितीकरणासाठी प्राधिकरणाकडे केवळ 15 अर्ज

0

नागरिकांचा प्रतिसाद कमी

पिंपरी : अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी राज्य सरकारच्या नियमावलीनुसार पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने नागरिकांकडून अर्ज मागविले होते. परंतु, याला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला नाही. सहा महिन्याच्या मुदतीमध्ये बांधकामे नियमित करण्यासाठी प्राधिकरणाकडे केवळ पंधरा जणांनीच अर्ज केले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका आणि प्राधिकरण हद्दीत अवैध बांधकामाची संख्या लक्षणीय आहे. प्राधिकरणाचे एकूण 42 सेक्टर आहेत. 1 ते 33 सेक्टरपर्यंत नियोजनबद्ध विकास झाला असल्याचे प्राधिकरणाचे म्हणणे आहे. या सेक्टरमध्ये अतिक्रमण नसल्याचा प्राधिकरणाचा दावा आहे. उर्वरित सेक्टरमध्ये सुमारे तीस हजार अतिक्रमणे असल्याचे प्राधिकरणाचे म्हणणे आहे.

सरकारी धोरणानुसार अटी आणि शर्तीच्या आधारे अवैध बांधकामे नियमित करण्याचे धोरण राबविले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर प्राधिकरण कार्यालयाने या संदर्भात अर्ज मागवले होते. अर्ज दाखल करण्याची मंगळवार (दि. 15) पर्यंत मुदत होती. साधारणपणे तीस हजार अतिक्रमणे असताना नियमितीकरणासाठी केवळ 15 अर्ज आले आहेत