निंभोरा- बसस्थानक परीसरातील शेतकर्याच्या घरातून 4 नोव्हेंबरच्या मध्यरात्री रोख रकमेसह मोबाईल लांबवण्यात आला. बस थांबा परीसरातील रहिवासी सुधाकर हरचंद भंगाळे यांचा घराचा दरवाजा रविवारी रात्री उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी 20 हजारांची रोख रक्कम व भंगाळे यांच्या पॅन्टच्या खिशातील दीड हजार रुपये आणि मोबाईल लांबवला. या प्रकरणी भंगाळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.