पारोळा : शहरातील आझाद चौकातील माहेर असलेल्या विवाहितेने माहेरहून सोन्याची चैन व घर भाड्याने घेण्यासाठी एक लाख रुपये आणावे यासाठी सासरच्यांनी छळ केला. या प्रकरणी पतीसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पतीसह आठ जणांविरोधात गुन्हा
पारोळा शहरातील आझाद चौक परीसरातील माहेर असलेल्या रूपाली एकनाथ चौधरी यांचा विवाह धुळे जिल्ह्यातील भडणे येथील एकनाथ भिका चौधरी यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेल्या नंतर पती एकनाथ चौधरी याने विवाहितेला माहेरहून सोन्याच्या चैनसाठी 50 हजार आणि घर भाङयाने घेण् यासाठी 50 हजार असे एकूण एक लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेला मारहाण करून छळ केला. या छळाला कंटाळून विवाहिता पारोळा येथे माहेरी निघून आल्या. त्यांनी पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने पती एकनाथ भिका चौधरी, सासू लता भिका चौधरी, सासरे भिका मोतीराम चौधरी, दिर कम्लेश भिका चौधरी, धर्मा मोतीराम चौधरी (सर्व रा.भडणे, ता.शिंदखेडा, जि.धुळे), आशाबाई रवींद्र चौधरी आणि रवींद्र बारकू चौधरी (दोन्ही रा.वाघ नगर, जळगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक योगेश जाधव करीत आहे.