शेलपिंपळगाव ।पावसामुळे खेड तालुक्यातील सिद्धेगव्हाण येथील शेतकरी सावळेराम कडलग यांचे घर कोसळले आहे. त्यामुळे त्यांच्यावर बेघर व्हायची वेळ आली आहे. ही घटना रविवार (दि.20) रोजी घडली होती. हे घर दुरुस्त करून देण्याचे आश्वासन सरपंच शशिकांत मोरे यांनी दिले आहे.
गेल्या आठवड्यात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे कडलग यांचे घर कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नसली तरी, कडलग यांच्या डोक्यावरचे छप्पर मात्र गेले आहे. पडलेल्या घराची पाहणी सरपंच शशिकांत मोरे यांनी ग्रामसेविका सारिका वाडेकर यांच्या समवेत करून शासनाकडून त्वरित नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली. शासकीय पातळीवरून होणार्या मदतीबरोबरच सावळेराम शिंदे यांना बेघर व्हायची वेळ येऊ, देणार नाही, असा धीर देत ग्रामपंचायतीच्यावतीने घर दुरुस्त करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच तोपर्यंत त्यांची तात्पुरती निवास व्यवस्था शेजारीच करण्यात आल्याची माहिती मोरे यांनी दिली.