घाटकोपरमधील दहिहंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

घाटकोपर । ढोल-ताशाच्या गजरात थरावर थर लावणारे गोविंदा… शिट्टीच्या आवाजात शिस्तबद्ध हालचाली… सीट डाऊन, अरे आरामसे, घाई नको… स्टेबल राहा… एकामागे एक सूचना… त्यात शेवटच्या थरावर चढणारा गोविंदा… सर्वांचे डोळे गोविंदाकडे… उपस्थितांची उत्कंठा शिगेला… थोडा जरी तोल इकडचा तिकडे झाला तरी सर्वांच्या मनात धस्स होते… दहीहंडी म्हटली की मुंबईच्या रस्त्यांवर हेच चित्र पाहायला मिळाले.त्याच पार्श्वभूमीवर दहीहंडीसाठी मानवी थरलावण्यावर मर्यादा घालण्याची मागणी अनेक सामाजिक संघटनाकडून केली जात होती. तसे काही निर्बंध घालण्यातही आले होते. मात्र नंतर पुन्हा मंडळांच्या आग्रही मागण्या मान्य करत हे निर्बंध हटवण्यात आले. मात्र त्याचा फारसा काही परिणाम झाल्याचं चित्र यावेळी निर्माण झालं नाही. कारण यंदाच्या वर्षीही अनेक गोविंदा जखमी झाले आहेत.

जखमी गोविंदांसाठी रुग्णालयात विशेष पथक
हंडी फोडताना काही गोविंदा जखमी होतात.त्याच्यावर तातडीने उपचार व्हावेत यासाठी रुग्णालयात विशेष पथक तैनात होते. घाटकोपर -विक्रोळी-भांडूप व मुलुंड मध्ये काही गोविंदा जखमी झाले होते. त्यापैकी महात्मा फुले रुग्णालय विक्रोळी १, मुलुंड अग्रवाल रुग्णालयात ४ या सर्वांची प्रकृती ठिक असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिली आहे.

३५ हजार पोलीस तैनात
दहीहंडी आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलातील ३५ हजार अधिकारी आणि जवान शहरातील अतिसंवेदनशील ठिकाणी तैनात करण्यात आले होते. केंद्रीय व राज्य राखीव बलाच्या १५ तुकड्या, एटीएस, शीघ्रकृती दल तैनात होत्या. दहीहंडी आणि स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यावर ड्रोनसह ५ हजार सीसीटीव्हींच्या माध्यमातून वॉच ठेवला होता.घाटकोपर येथील मा.राम कदम मित्र मंडळ आयोजित दहिहंडीत तसे चित्र पहायला मिळाले.

शूरवीर बाजीप्रभू मंडळाच्या दहिहंडीला उत्स्फुर्त प्रतिसाद
घाटकोपर मधील शूरवीर बाजीप्रभु मंडळ आयोजित मानाची दहिहंडी फोडण्याचा मान रामबाण मंडळला मिळाला. सकाळपासूनच ही दहिहंडी फोडण्यासाठी पूर्व उपनगरातील अनेक गोविंदा पथकांनी हजरी लावली होती. दहिहंडी पारितोषिक वितरणास शिवसेना उपविभागप्रमुख महेश जंगम, प्रकाश वाणी, सचिन भांगे, महेश नेमन, राजू पिंम्पले, मंडळाचे नाना उतेकर, बाळा गोसावी, यशवंत पवार, संतोष नेहरकर आणि इतर सदस्य उपस्थित होते,

राम कदम मित्र मंडळ दहिहंडीस लोटला जनसागर
घाटकोपर पश्चिम राम कदम मित्र मंडळ आयोजित “आई-वडील हेच साक्षात परमेश्वर” असा संदेश देणारी घाटकोपरमधील सर्वात मोठी दहीहंडी भारत गौरव पुरस्कार तथा गिनिज बुक रेकाँर्ड होल्डर राम कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष नरेश चंदराणा, जिल्हा महामंत्री चंद्रकांतत मालकर,मंडळ अध्यक्ष रवि पूंज,आरोग्य विभागप्रमुख अरुण एखंडे यांच्या नियंत्रणात घाटकोपर पश्चिम येथील एलाबीएस मार्ग, श्रेयस सिनेमा सिग्नल येथे पार पडली. या दहिहंडीला पूर्व-पश्चिम उपनगरासह मुंबईतील अनेक नामवंत गोविंदा पथकांनी हजेरी लावली.आयोजकांतर्फे चोख पोलीस बंदोबस्तसह आवश्यक सुरक्षा ठेवण्यात आली होती.शिवाय १४ वर्षाखालील गोविंदाला वरच्या थराला पाठवू नये. तसे आढळल्यास गोविंदा पथकाला बाद करण्यात येईल अशी सुचना करत मंडळातर्फे कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला केला.

उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींचा गौरव
घाटकोपर-विक्रोळी विभागातील तसेच पूर्व-पश्चिम उपनगरसह मुंबईत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना ” घाटकोपर भुषण” तसेच “महाराष्ट्र गौरव “पुरस्कार-२०१७ विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींच्याहस्ते देऊन गौरविण्यात आले.विक्रोळी पार्क साईट विभागातील प्रशांत कदम यांचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार-२०१७ देऊन गौरव करण्यात आला त्यावेळी घाटकोपर-विक्रोळी मधील गोविंदा पथक व उपस्थित गोविंदा रसिकांनी घाटकोपर-विक्रोळी चा गौरव झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत टाळ्यांचा कडकडाट केला. प्रशांत कदम हे धावापटू असून त्यांच्या या कार्याची गिनीज बुक रेकाँर्डमध्ये नोंद झालेली आहे. शिवाय नितीन जाधवा यांच्यासह जेष्ठांना व रुग्णांना इच्छुक स्थळी मोफत रिक्षाने सेवा देणाऱ्या रिक्षाचालक यांचाही घाटकोपर भुषण पुरस्कार-२०१७ देऊन सत्कार केला.

सिनेमा क्षेत्रातील कलाकारांची राम कदम मित्र मंडळ आयोजित दहिहंडीला उपस्थिती

सकाळपासूनच राम कदम मित्र मंडळ आयोजित भारतातील सर्वांत उंच अशा या दहिहंडीला सिनेमा क्षेत्रातील जितेंद्र, अर्जून रामपाल यांच्यासह अनेक निर्माते आणि प्रसिद्ध कलाकारांनी आपली उपस्थिती दाखवली. सिनेकलाकारांनी घाटकोपर धगरीत आपला भारदार परफाँर्मन्स दाखवत सर्वांनाच नाचवले. शिवाय विदेशी नागरिकांकडून या दहिहंडीला चांगला प्रतिसाद लाभला. या नागरिकांनी “भारत माता की जय” “वंदे मातरम्” अशा घोषणा दिल्या त्यावेळी संपूर्ण परिसरात नवचैतन्याची लाट उसळली. विदेशी नागरिक वंदे मातरम् अभिमानाने जर म्हणत असतील तर भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांकडून “वंदे मातरम्”का म्हटले जाऊ नये असा प्रश्न यावेळी आमदार राम कदम यांनी उपस्थित केला. त्यांनी जाहीर आवाहनही केले की, या देशात जर राहायचं असेल तर…”वंदे मातरम्” म्हणायलाच हवे. यावेळी तर संपूर्ण परिसर “भारत माता की जय” व “वंदे मातरम्” ने दुमदुमला.

राजकीय पक्षांमधील अनेकांची हजेरी
भ्रष्टाचाराची हंडी फोडून भ्रष्टाचार मुक्त होऊ या- मुख्यमंत्री फडणवीस
सकाळपासूनच सुरु झालेल्या गर्दीला व मंडळच्या कार्यकत्त्यांना भेट देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह भाजपाचे अनेक नेते,मंत्री, कँबिनेट मत्री यांनी भेट देऊन आयोजकांचे कौतुक करत गोविंदा पथकांना प्रोत्साहन दिले. खासदार,आमदार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रात्रौ ९-३० वा.भेट दिली. तेव्हा त्यांच्यासोबत राम शिंदे, जयकुमार राऊळ हे उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, आपण भ्रष्टाचार ची हंडी फोडून भ्रष्टाचार मुक्त होऊ या. प्रत्येकाने आई-वडील यांची सेवा करता करता या भारत मातेचीही सेवा करा. घाटकोपरची ही हंडी विकासाची हंडी आहे. आज स्वातंत्र्य दिन व दहिहंडी आहे तेव्हा या स्वातंत्र्यदिनीच विकासकाची कामे करत भ्रष्टाचार मुक्त भारत करु या. नवभारताची निर्मिती करण्याचा संकल्प करून भारत मातेची सेवा करु या. शेवटी मुख्यमंत्री व सिने कलाकार रणवीर सिंग यांच्या उपस्थितीत दहिहंडी फोडून जन..गण..मन…नी या दहिहंडी सोहळ्याची सांगता करण्यात आली.