मुंबई: घाटकोपरमधील सर्वोदय दवाखान्याजवळ चार्टर्ड विमान कोसळले आहे. या दुर्घटनेत एका पादचारी व विमानातील चार अशा पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या परिसरात मोठा आवाज होऊन आगीचे लोट पसरले. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण आहे. घाटकोपर पश्चिमेकडील माणिकलाल भागात ही घटना घडली. हा आवाज नेमका कसला? नेमकी घटना काय, हे बराच वेळ समजत नव्हते. या घटनेनंतर परिसरात गोंधळाचे वातावरण आहे.
उत्तरप्रदेश सरकारच्या नावावर हे विमान आहे. मात्र उत्तरप्रदेश सरकारने हे विमान विकलेले आहे.
जागृतीनगर जॉगर्स पार्कजवळ बांधकाम सुरु असलेल्या इमारतीनजीक चार्टर्ड विमान कोसळले. भर वस्तीत विमान कोसळल्याने एकच खळबळ उडाली. विमान कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला आणि त्यानंतर आग लागली. आगीचे धूर परिसरात पसरत होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.