घाटकोपर ( निलेश मोरे ) – सुंदर मुंबई हरित मुंबई . प्लास्टिक मुक्त मुंबईचा संदेश देणाऱ्या सराव दहीहंडीच रविवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी जय संतोषी माता चौक , गोळीबार रोड येथे एन वार्ड प्रभाग समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी आयोजन केले आहे . यंदाचे हे तिसरे वर्ष असून यावेळी हंडीपथकांना सामाजिक संदेश देण्यासाठी प्लास्टिक मुक्त मुंबई , स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई हि संकल्पना मांडली असल्याचं आयोजक प्रभाग समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सांगितले .
यावेळी सविस्तर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले कि उत्सव हा एकतेचा मार्ग आहे . उत्सवामुळे आज लोक एकत्र येतात हि सामाजिक दृष्ट्या आनंदाची बाब आहे पण एकत्र असे उत्सव साजरे करताना पर्यावरणावर , शहरावर त्याचा परिणाम होता काम नये . अनेकवेळा उत्सव साजरे करताना पर्यावरणाला धोका पोहोचेल अशा गोष्टी करतो दहीहंडी , गणेशोत्सव हे समाजातील एकता टिकवणारे उत्सव आहेत .असे उत्सव साजरे करताना नागरिकाकडून सर्रास प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो लोकांमध्ये पालिकेकडून अनेकवेळा जनजागृती केली जाते . मी नगरसेवक आणि प्रभाग समिती अध्यक्ष एन वार्ड म्हणून गोविंदा पथकांना प्लास्टिकचे दुष्परिणाम कळावे यासाठी यंदा आम्ही प्लास्टिक मुक्त मुंबई हि संकल्पना या सराव दहीहंडी मध्ये मंडळी असून येणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकांना आम्ही व्यासमंचाद्वारे प्लास्टिकचा वापर न करण्याचे आवाहन करणार आहोत तसेच सहभागी पथकांना प्लास्टिकचे पर्यावरणावर आणि आरोग्यवर होणारे दुष्परिणाम काय असतात हे माहिती देणारे अहवाल वाटणार असल्याचं आयोजक नगरसेवक , प्रभाग समिती अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सांगितले