चाळीसगाव । शहरातील घाटरोड वरील सुभाष प्लाझाच्या लगत श्रीराम वखारीच्या समोर लोटगाडीच्या आडोशाला विनापरवाना 28 हजार 132 रुपये किमतीचा देशी दारु साठा बाळगणार्यास चाळीसगाव अप्पर अधीक्षक पोलीस कार्यालयाच्या पथकाने दिनांक 9 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता छापा मारुन मुद्देमलासह एकास ताब्यात घेवुन कारवाई करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी शहरातील घाटरोड वरील सुभाष प्लाझाच्या लगत श्रीराम वखारीच्या समोर लोटगाडीच्या आडोशाला विनापरवानादेशी दारुचा साठा एक जण कब्जात बाळगून असल्याची गोपनीय माहिती अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बछाव यांना मिळाल्यावरुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पो उ नि प्रदीप वाल्हे, हवालदार युवराज नाईक, पो.कॉ.नितीन आगोणे, नितीन वाल्हे यांनी 9 मार्च 2018 रोजी त्याठिकाणी सायंकाळी 6 वाजता छापा मारुन आरोपी साहेबराव दगा चौधरी (43) हा त्याच्या जवळ 27 हजार 456 रुपये किमतीचे टँगो पंच देशी दारुचे 11 खोके त्यात 52 रुपये किमतीच्या 528 बाटल्या व 676 रुपये किमतीच्या 13 देशी दारु टँगो पंच बाटल्या असा एकुण 28 हजार 132 रुपये किमतीचा देशी दारु साठा कब्जात बाळगताना मिळुन आला आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेवुन त्याच्या विरोधात पो कॉ नाना चित्ते यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला कलम 65 ई प्रमाणे कारवाई करण्यात आली असुन तपास हवालदार शशिकांत पाटील करीत आहेत.