नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची कारवाई
शहादा- धडगाव तालुक्यातील घाटली गावात बनावट दारु निर्मिती कारखान्यात नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने टाकलेल्या छाप्यात दोन लाख 84 हजार 30 रुपये किंमतीचे बनावट दारूसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. या आठवड्यातील दुसर्यांदा ही कारवर्इा झाली आहे.
गोपनीय माहितीवरून छापा
घाटली (ता.धडगाव) परीसरात अवैधरीत्या बनावट दारुची निर्मिती करून तिची धडगाव तालुक्यात विक्री होत असल्याची माहिती नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाल्यनंतर सापळा रचून रविवारी दुपारी अडीच वाजता छापा टाकण्यात आला. घटनास्थळी एक महिंद्रा कंपनीची जिया (चारचाकी) वाहनात 200 लिटर स्पीरीट एका ड्रममध्ये आढळले तर घर झडतीत दोनशे लीटरचे दोन ड्रम स्पीरीटचे आढळले तर बनावट दारु निर्मितीसाठी लागणारे तीन 35 लिटर क्षमतेचे कॅन स्पिरिटने भरलेले, रीकामे पुठ्याचे बॉक्स 40 नग घरातील बेडमध्ये लपवलेले आढळले. रीकाम्या प्लास्टिकच्या 180 मिली क्षमतेच्या 400 बाटल्या, दोन 500 पत्री बुच, दोन बुच सील करण्याचचे मशीन्स, इसेन्स दोन बाटल्या, दोन प्लॅस्टिक ट्रे, आदी साहित्य आढळल्याने ते जप्त करण्यात आले. या प्रकरणी बनावट दारू निर्मिती कारखान्याचे मालक पिंट्या झुंझार पावरा (रा.घाटली, ता.धडगाव) हा पसार असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. एकूण दोन 2 लाख 84 हजार 30 रुपये कमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई भरारी पथकाचे निरीक्षक मनोज संबोधी, दुय्यम निरीक्षक प्रशांत पाटील, हंसराज चौधरी, हेमंत पाटील, दर्शल नांदे आदींनी केली.
नागरीकांना आवाहन
जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडू देण्यात आलेल्या अनुज्ञप्ती (परवाना) दुकानाशिवाय कोणत्याही ठिकाणावरुन मद्य खरेदी व सेवन करू नये तसेच तसेच बनावट दारु निर्मितीबाबत काही माहिती मिळाल्यास त्यांनी नजीकच्या पोलीस स्टेशन अथवा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे माहिती द्यावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक मनोज संबोधी यांनी केेले आहे.