पुणे : सिंहगड जाणार्या मार्गावरील घाटात भली मोठी दरड कोसळली. यामुळे सिंहगडकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती, गडावर मोठ्या संख्येने पर्यटक आडकले आहेत. या धोकादायक दरडीचा वेळीच अंदाज आल्याने सुरक्षारक्षकांनी दरड कोसळण्याआधीच या भागातली वाहतूक बंद केली होती.