घाट रस्त्याची दुरुस्ती

0

पानशेत । कोंढणपूरमार्गे सिंहगडावर येणार्‍या पर्यटकांसाठी अवसरवाडी घाट रस्ता जवळचा ठरतो. मात्र, या घाट रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने या मार्गे ये-जा करणे कठीण बनत आहे. तसेच या मार्गावर अपघाताचा धोकाही वाढला आहे. या घाट रस्त्याचे काम संबंधित विभागाने त्वरीत करावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत होती. त्यानुसार आता या अवसरवाडी घाट रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. या मार्गाची दुरुस्ती करण्यात येणार असून मार्गातील खड्डे बुजविण्यात येणार आहेत. यामुळे सिंहगड तसेच पानशेत भागात ये-जा करणार्‍यांना हा घाट रस्ता फायदेशीर ठरणार आहे. परंतु, या घाट रस्त्याचे काम संबंधित विभागाकडून कधी सुरू करण्यात येणार? असा प्रश्नही नागरिकांना पडत आहे.