साक्री। वीजग्राहकांना योग्य सेवा मिळावी यासाठी महावितरण कंपनी अनेक नवे उपक्रम राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून साक्री तालुक्यातील घाणेगाव येथे महावितरण कंपनीच्या वतीने ग्राहक संवाद मेळावा घेण्यात आला. याद्वारे अनेक विज ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले.
हा मेळावा हा धुळे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय सरग यांच्या मार्गदर्शनाने , साक्रीचे उपकार्यकारी अभियंता किशोर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितित घेण्यात आला. या अध्यक्षस्थानी सरपंच श्री. देवरे होते. वेगवेगळ्या तक्रारींच्या सोडवणुकीसाठी अभियंता रोहित पाटील, कपिल सानफ ,समाधान पाटील, सोनलकुमार नागरे ,सतीश बेंद्रे , प्रकाश कांबळे ,किरण नांद्रे यांनी प्रयत्न केले. यावेळी किशोर पाटील यांनी विजचोरी, विजगळती कमी होणेेबाबत तसेच शेतीपंप ग्राहकांसाठी नवीन सौरकृषीपंप योजनेबबत सविस्तर माहिती दिली.