घाणेगाव येथे वीजग्राहक तक्रार निवारण मेळावा

0

साक्री । वीजग्राहकांना योग्य सेवा मिळावी यासाठी महावितरण कंपनी अनेक नवे उपक्रम राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून साक्री तालुक्यातील घाणेगाव येथे महावितरण कंपनीच्या वतीने ग्राहक संवाद मेळावा घेण्यात आला. याद्वारे अनेक विज ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले. हा मेळावा हा धुळे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय सरग यांच्या मार्गदर्शनाने , साक्रीचे उपकार्यकारी अभियंता किशोर पाटील यांच्या उपस्थितित घेण्यात आला.

सौरकृषी पंप योजनेबाबत सविस्तर माहिती
अध्यक्षस्थानी सरपंच श्री. देवरे होते. वेगवेगळ्या तक्रारींच्या सोडवणुकीसाठी अभियंता रोहित पाटील, कपिल सानप, समाधान पाटील, सोनलकुमार नागरे ,सतीश बेंद्रे , प्रकाश कांबळे, किरण नांद्रे यांनी प्रयत्न केले. यावेळी किशोर पाटील यांनी वीजचोरी, वीजगळती कमी होणेेबाबत तसेच शेतीपंप ग्राहकांसाठी नवीन सौरकृषीपंप योजनेबबत सविस्तर माहिती दिली. त्याद्वारे महावितरणला सहकार्य करावे योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी घाणेगाव व हट्टी येथील मोठ्या संखेने नागरिक विजग्राहक उपस्थित होते. यशस्वितेसाठी दिनेश वाघ ,योगेश जाधव, सुनील पवार, मनोज भदाणे, दिनेश माळी , प्रस्ताविक व् आभार किरण नांद्रे यांनी केले.