बोदवड- भरधाव अॅपे रीक्षाने धडक दिल्याने मलकापूर तालुक्यातील घिरणीच्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला बोदवड पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद होती तर तपासात हा अपघात असल्याचे निष्पन्नन झाल्याने बुधवारी अॅपे रीक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी हवालदार संजय भोसले यांच्या फिर्यादीनुसार अॅपे रीक्षाचालक अनिल गुमानसिंग चव्हाण विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शंकरसिंग त्र्यंबकसिंग चव्हाण (45, घिरणी, ता.मलकापूर) हे दुचाकी (एम.एच.28 ए.यु.1303) ने बोदवडकडून मलकापूरकडे 5 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जात असताना भरधाव अॅपे रीक्षा (एम.एच.19 बी.एम.447) ने धडक दिल्याने शंकरसिंग यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केल्यानंतर अॅपे चालक अनिल गुमानसिंग चव्हाण विरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास सहाय्यक फौजदार प्रभाकर पाटील करीत आहेत.