चंदीगढ: पंजाबजवळील पाकिस्तानी सीमारेषेवर घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या घोसखोरांचा प्रयत्न बीएसएफ जवानांनी हाणून पाडला. पाच घुसखोरांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे. आज शनिवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. बीएसएफच्या 103 बटालियनच्या जवानांनी भारत-पाकिस्तान सीमेजवळ डल सीमा चौकीवर काही संशयास्पद हालचाली पाहिल्या. यानंतर पहाटे 4.45 वाजता बीएसएफच्या जवानांवर गोळीबार करण्यात आला. याला जवानांनी चोख प्रत्यूत्तर दिले. सकाळी या भागातून पाच पाकिस्तानी घुसखोरांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.
दरम्यान आजच सकाळी दिल्लीतही पोलिसांनी मोठी कारवाई करण्यात आली. यात आयएसआयच्या दहशतवाद्याला आयईडी बॉम्बसह ताब्यात घेण्यात आले. तर दुसरा दहशतवादी फरार झाला आहे.
दिल्ली पोलिसांनी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला आहे. IED स्फोटकांचा साठा जप्त केला आहे. अब्दुल युसूफ या दहशतवाद्याकडून दोन IED स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. त्याच्यासोबत आणखी एक साथीदार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र चकमकीदरम्यान तो फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.