इंदूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नागरिकत्व कायदा लागू केल्यानंतर अनेक ठिकाणी विरोध प्रदर्शन करण्यात येत आहे. तसेच या मुद्द्यावर अनेक ठिकाणी चर्चा पण घडून आल्या आहेत. देशातल्या घुसखोरांना कसे ओळखायचे यावर सुद्धा काही ठिकाणी चर्चा घडून येताना दिसत आहे. भाजपाचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी नुकतीच अलीकडे या बाबत वक्तव्य केले आहे. बांगलादेशी नागरिकाला मी पोहे खाण्याच्या पद्धतीवरून ओळखले असल्याचा दावा केला. तसेच नागरिकत्व कायदा देशाच्या भल्यासाठीच आहे. या कायद्यामुळं खऱ्या शरणार्थींना नागरिकत्व मिळणार असून घुसखोरांची ओळख पटणार आहे. हे घुसखोर देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
इंदूर प्रेस क्लबने आयोजित केलेल्या ‘लोकशाही, राज्यघटना आणि नागरिकत्व’ या विषयावरील चर्चेत भाग घेताना ते बोलत होते. ‘माझ्या घरातली एक खोली मी हल्लीच दुरुस्त करून घेतली. त्या कामावर असलेले मजूर एकदा पोहे खात होते. त्यांची खाण्याची पद्धत मला थोडी विचित्र वाटली. ते मजूर बांगलादेशी आहेत का, याची चौकशी मी कंत्राटदाराकडं केली. त्या मजुरांनाही हाच प्रश्न विचारला. त्यानंतर ते कामावर आलेच नाहीत,’ असं विजयवर्गीय म्हणाले. ‘या प्रकरणी मी अद्याप पोलिसांकडे तक्रार केलेली नाही. लोकांना जागरूक करण्यासाठी मी हा किस्सा सांगतोय. कुठल्याही खोट्या अफवांवर विश्वास ठेवू न ठेवण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.