घोटानेत मुले पकडण्याच्या संशयातून तीन साधूंना ग्रामस्थांनी चोपले

0
नंदुरबार :  म्हसावदची घटना ताजी असतांनाच नंदुरबार तालुक्यातील घोटाणे गावातही मुले पकडण्याच्या संशयातून तीन साधू बाबांना ग्रामस्थांनी चोप देऊन पोलिसांच्या हवाले केले. साधूच्या वेशात मुले पकडणाऱ्यांची टोळी असल्याचा संशय घेत घोटाणे गावात तीन साधू बाबांना पकडण्यात आले. त्यांना चोप देऊन मंदिरात कोंडण्यात आले होते. पोलिस आल्यानंतर त्यांना ताब्यात देण्यात आले आहे. ते साधू आहेत की कोण ? याचा तपास पोलिस करीत आहेत. मुलं पकडण्यासाठी आलेल्या संशयातून पंढरपूर येथील तीन जणांना म्हसावदला चांगलाच चोप देण्यात आल्याची घटना ताजी असतांना दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी घोटाणे गावात ही घटना घडली.