मुंबई: ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिखर बँक घोटाळा प्रकरणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह ७० जणांवर ईडीकडून काल मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, याप्रकरणावरून अजित पवार यांनी पलटवार केला आहे. जर बँकेत 25 हजार कोटींचा घोटाळा झालेला असेल, तर ती बँक अडीचशे ते तीनशे कोटींचा नफा कशी कमावते,” असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.
“शिखर बँकेच्या कोणत्याही पदावर शरद पवार नव्हते. त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. माध्यमातून वृत्त आल्यानंतरच शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मला कोणावरही आरोप करायचा नाही. यंत्रणांना तपास करण्याचा अधिकार आहे. त्यांनी खुशाल चौकशी करावी. पण ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना मत मांडायला वेळ द्यायला हवा ना?” असे अजित पवार म्हणाले.