चोपडा । जिल्हा परिषदेच्या घोडगाव-लासूर गटातून उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अनिल जिजाबराव वाघ यांना अपक्ष म्हणून याच गटासाठी उमेदवारी अर्ज भरलेले अनिल हिंमतराव पाटील (रा. लासूर) व विकास भाऊराव पाटील (रा. गणपूर) यांनी माघारीच्या दिवशी नियोजित वेळेत माघारीसाठी पोहचू न शकल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल वाघ यांना जाहीररित्या पाठींबा दिला आहे. अनिल पाटील यांच्या मागील कार्यकाळातील सामाजिक बांधिलकी व कार्यपाहून जाहीर पाठींबा दिल्याचे अनिल पाटील व विकास पाटील यांनी दैनिक जनशक्तिशी बोलतांना सांगितले.
अनिल वाघ यांच्या प्रचार रॅलीतही सहभाग
केंद्र शासन व राज्य शासन जि.प.च्या माध्यमातून केलेला विकास कामाची माहिती घेवून गोरगरिबांच्या व शेतकरी, रुग्णांना योजनेच्या खरा लाभ दिला जातो का अशा समस्या जाणुन घेणार, महिलांसाठी शौचालय बांधुन महिलांना खरा न्याय मिळवुन देणार, जि.प.च्या माध्यमातून शेतकर्यांच्या अडीअडचणी सोडवणार व शेतकर्यांना शेती उपयोगी अवजारांचा विविध योजना मिळवुन देणार, आदिवासी समाजासाठी समाज कल्याण योजनेच्या लाभ लोकांपर्यंत पोहचविणार गावा-गावामंध्ये काँक्रिटीकरण करणे, गटारी नविन बनविणे आदी योजनांच्या लाग मिळवुन कामांना प्राधान्य देणार आहे. कष्टकरी यांच्यासाठी असून त्यांच्या पाल्याचे शिक्षणासह जीवनमान उंचवण्यासाठी गटात चौफेर विकास करण्यासाठी कटीबद्ध असून त्याच्या प्रचारार्थ रॅलीत अनिल पाटील व विकास पाटील यांनी सहभाग नोंदवला असून गटात जोरदार आघाडी घेतली आहे.