मुक्ताईनगर- तालुक्यातील घोडसगाव येथील चुडामण देवचंद इंगळे (60) हे शेतात बकर्या चारायला गेले असताना विजेचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, 29 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास उघडकीस आली. सुरेश रघुनाथ खेवलकर यांच्या घोडसगाव शेती शिवारातील 124 गट नंबर मधील शेताच्या बांधावर इंगळे यांचा मृतदेह आढळला. मयताचा मुलगा प्रमोद इंगळे यांच्या खबरीवरून मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत इंगळे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परीवार आहे. तपास पोलीस कॉन्स्टेबल माणिकराव निकम करीत आहे.