मुक्ताईनगर : तालुक्यातील घोडसगाव शिवारात सारंग पटेल यांच्या शेतात शनिवार, 16 रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास वाघाने यादवराव शेळके यांच्या मालकिच्या गायीवर वाघाने हल्ला करीत गायीचा फडशा पाडल्याने पशूपालकांमध्ये घबराट पसरली आहे.
पट्टेवार वाघाचा वावर
गेल्या काही महिन्यांपासून पट्टेदार वाघ घोडसगाव शिवारात संचार करीत आहे. वेळोवेळी वनविभाग तसेच अधिकार्यांना सूचना देऊन सुद्धा कुठल्याच प्रकारची दखल घेतली जात नसल्याने शेतकरी व पशू पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी रात्री वाघाने एक गायीवर हल्ला करीत तिचा फडशा पाडल्याने शेतकर्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भाजपा तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जवरे शेतकरी यादवराव शेळके, अरुण जावरे, सुभाष जावरे, धनराज सावळे, गणेश जावरे, गजानन शेळके तसेच वनविभागाचे दिगंबर पाटील, वनमजूर टी.एन.घरजाळे, वनरक्षक नितीन खंडारे यांनी धाव घेत माहिती जाणून घेतली.