चाळीसगाव – तालुक्यातील घोडेगाव शिवारात बकर्या चारत असलेल्या 30 वर्षीय विवाहीतेवर मारहाण करुन दोघांच्या मदतीने एकाने बलात्कार केल्याची घटना 18 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली असून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तिघा पिता पुत्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तालुक्यातील घोडेगाव येथील 30 वर्षीय विवाहीतेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्या दिनांक 18/9/2018 रोजी घोडेगाव शिवारातील शेतात बकर्या चारत असतांना नांदगाव (जि नाशिक) तालुक्यातील ढेकु येथील देवसिंग रेखा चव्हाण, अंकुश देवसिंग चव्हाण, एकनाथ देवसिंग चव्हाण हे 11 वाजेच्या सुमारास मोटारसायकलवर आले व त्यांचे तोंड रुमालाने गुंडाळुन शेजरच्या शेतात नेऊन त्यातील एकाने हातावर व मानेवर काहीतरी धारदार वस्तू मारुन दुखापत केली व त्यांच्यावर बलात्कार केला. फिर्यादीवरुन तिघांवर बलात्कार व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तपास पो उ नि जगदीश मुळगीर करीत आहेत.