हडपसर । गेली 20वर्षे मुंढवा घोरपडी परिसरातील नागरिकांना घोरपडी रेल्वे गेटची समस्या भेडसावत आहे. खासदार अनिल शिरोळे, राजमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह तत्कालीन रक्षामंत्री मनोहर परिकर यांच्याकडे पाठपुरावा केल्याने अंतरिम मंजुरी मिळाली आहे. लवकरच या उड्डाणपुलाचे काम सुरू होत असल्याने येथील वाहतुकीचा प्रश्न निकाली निघेल असा दावा आमदार योगेश टिळेकर यांनी केला आहे.
आयुक्तांकडून जागेची पाहणी
मुंढवा घोरपडी येथील उड्डाणपूल संरक्षण मंत्रालयाच्या परवानगीमुळे रखडले होते त्यामुळे सतत वाहतूककोंडी होऊन नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत होता, तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर परिकर यांच्याकडे 7 जानेवारी 2015 रोजी रेल्वे गेटवर उड्डाणपूल बांधण्यासाठी आवश्यक जागा ही संरक्षण खात्याकडे आहे. त्या जागेवर काम करण्यासाठी ना हरकत दाखला मंत्रालयाकडून मिळावी ही विनंती केली होती. तेव्हा त्यांनी स्वतः या जागेची पाहणी करून या जागेच्या सगळ्या कायदेशीरबाबी पूर्ण करून दिल्या होत्या. या कामाला गती मिळावी जागेवरील कार्यवाहीसाठी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह यांच्यासह आमदार योगेश टिळेकर यांनी जागा पाहणी केली आणि उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली. यावेळी स्थानिक नगरसेवक उमेश गायकवाड, नगरसेविका लताताई धायरकर, मंगला मंत्री, हिमाली कांबळे, डॉ कुमार कोद्रे, पंचायत समिती सदस्य जीतशेठ भंडारी, संदीप लोणकर, किशोर धायरकर, अशोक पठारे, प्रशांत जगता, सागर बारदस्कर आदी उपस्थित होते.
वाहतूककोंडी टळेल
मुंढवा घोरपडी येथील वाहतुककोंडीची समस्या वाढत चालली होती, उड्डाणपुलाचे काम सुरू करताना संरक्षण मंत्रालयाच्या परवानगीची अडचण होती खासदार अनिल शिरोळे, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या सह केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा करून ना हरकत प्रमाणपत्र मिळविले आहे, आयुक्तांसह येथे पाहणी करून उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली आहे, येथील वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होईल.
– योगेश टिळेकर
आमदार, हडपसर विधानसभा